नीला कदम या एम.एड., एम.फिल. असून, शिवाजी मराठा संस्थेत त्यांनी 34 वर्षे अध्यापन केले आहे. प्राध्यापिका, समाजसेविका, नगरसेविका, लेखिका, नाट्यदिग्दर्शिका अशी अनेक वलयं लाभलेल्या नीला कदम या गेली 7 वर्षे राज्य शिक्षण मंडळावर उच्च माध्यमिक मराठी विभागाच्या समन्वयक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी ‘बालचित्रवाणी’ या दूरदर्शनवरील कार्यक्रमात सुमारे 58 पटकथांचे लेखन, तसेच आकाशवाणीवरील ‘शालेय जगत’साठीही लेखन केले आहे. शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे हजारहून अधिक वेळा सूत्रसंचालन केले आहे.
आकाश जिंकणार मी