Thumbnail

प्रकाश अकोलकर यांनी महाराष्ट्र टाइम्स या सुप्रतिष्ठित दैनिकात विविध पदांवर काम केले. त्यांना राजकीय तसेच सांस्कृतिक क्षेत्रातील बातमीदारीचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांचे ‘झोत’, ‘प्रसंग’, ‘पेनड्राइव्ह’ असे वृत्तपत्रातील स्तंभ गाजले आहेत. बातमीदारी करताना ‘शिवसेना’ हा त्यांचा अभ्यासविषय बनला. शिवसेनेच्या इतिहासाचे जिवंत चित्रण करणारा ‘जय महाराष्ट्र’ हा त्यांचा ग्रंथ प्रसिद्ध आहे. ‘मुंबई ऑन सेल’ या पुस्तकात त्यांनी राजकारणी, नोकरशहा आणि कंत्राटदार यांनी मुंबईत काय केले, याचे घणाघाती चित्रण केले आहे.