Thumbnail

पत्रकार सुनील शंकरराव माळी हे पुण्याच्या विविध दैनिकांमध्ये गेली पस्तीस वर्षं वेगवेगळ्या पदांवर कार्यरत होते. दै.’सकाळ’मध्ये सहयोगी संपादक म्हणून २०११मध्ये कामाला सुरुवात केली आणि सध्याही त्याच दैनिकात ते कार्यरत आहेत. पत्रकारितेतील ‘वरुणराज भिडे पुरस्कार’, सासवड येथील ‘आचार्य अत्रे प्रतिष्ठान’चा ‘आचार्य अत्रे पुरस्कार’ तसेच ‘बंधुता पुरस्कार’ आदीं मानाचे पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत.
‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या अहमदाबाद आवृत्तीचे तत्कालीन संपादक किंगशुग नाग यांनी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर निष्पक्ष पद्धतीने लिहिलेल्या इंग्लिश
पुस्तकाचे ‘विश्वकर्मा पब्लिकेशन्स’साठी मराठीत रूपांतर सुनील माळी यांनी केले आहे.