जग बदललंय, बदलतंय. चूक आणि बरोबर, चांगलं आणि वाईट, नैतिक आणि अनैतिक यांच्या सीमारेषेवरचं काटेरी कुंपण कधीच उद्ध्वस्त झालंय. मग आपण सीमारेषेच्या या बाजूला आहोत का त्या, कसे कळणार? या बाजूचे लोक चांगले आहेत, म्हणजे त्या बाजूचे लोक वाईटच आहेत, याची खात्री आहे का? एकत्र कुटुंबपद्धती इतिहासजमा झाल्यावर कुटुंबं, देश-परदेशांत विखुरली आहेतच; पण रक्ताच्या त्या नात्यांना निभावून नेण्यासाठी कोणी वैयक्तिक सोयी- सुविधांचा त्याग करायला तयार आहे का? आणि मग ही जवळची नाती सशक्त राहण्यासाठी प्रेम आणि ओढ जास्त महत्त्वाची की अंतर? स्मार्टफोनच्या जमान्यात आपण बोलायच्या ऐवजी चॅटिंग करतो, कानांऐवजी डोळ्यांनी ऐकतो, तोंडाऐवजी हाताने बोलतो आणि शब्दांऐवजी इमोजी वापरतो. अशा परिस्थितीत एकही शब्द न बोलता नातेसंबंध जोडणे शक्य आहे का? जात-धर्म-पंथ यांच्या बाहेर आपण नाती जोडायला शिकलोय खरे; पण आहेत का ती नाती मजबूत रक्ताच्या नात्यांसारखी? राहतील का ती शाबूत, कितीही वादळे आणि संकटे आली तरीही? राहतील का उभी, आपल्या पायाभूत संस्कारांखाली, कितीही सुरूंग लागले तरी? शहरातले लोक हुशार आणि गावाकडचे बावळट. तगेल का हे समीकरण इंटरनेटच्या युगात? ह्या आणि अशा अनेक प्रश्नांचा वेध घेत, गुंतागुंतीच्या मानवी नातेसंबंधांचा ठाव घेण्यासाठी – आगंतुक.
Aagantuk-आगंतुक
save
₹35.00₹225.00₹260.00
Customer Reviews
There are no reviews yet.
Be the first to review “Aagantuk-आगंतुक”
You must be logged in to post a review.