आत्म्याचे नाव अविनाश
स्वामी विवेकानंद आणि गांधीजींना गुरुस्थानी मानून ‘ भारताचा कार्यकर्ता ‘ होण्याचं ध्येय निश्चित करून आयुष्याला उद्दात अर्थ देणारा सोळा वर्षाचा एक युवक – अविनाश धर्माधिकारी . १९८६ मध्ये महाराष्ट्रातून ला निवडला गेलेला एकमेव मराठी अधिकारी . त्यानंतर त्यांनी त्यांच्या प्रसाशकीय सेवेत , सामाजिक सांस्कृतिक शेक्षणिक क्षेत्रात कर्तृत्व गाजवलं आणि जगाच्या नकाशावर ” चाणक्य मंडळ परिवार ” चं अढळ स्थान निर्माण केलं . अनेक महत्वाच्या विषयांना स्वतःला पणाला लावलं . स्वतःच्या विचारांनी अनेक क्षेत्रात योगदान दिलं . ध्येयावर अचल निष्ठा असणाऱ्या , युवावर्गाचं आकर्षण असणाऱ्या त्या कर्तबगार, जिद्दी व्यक्तिमत्वाची प्रेरणादायी अशी हि चरित्रगाथा … वाचली पाहिजे अशी .
- माजी आयएएस अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांच्या कर्तबगार, जिद्दी व्यक्तिमत्त्वाची ही प्रेरणादायी चरित्रगाथा आहे.
- त्यांनी प्रशासकीय सेवेत, सामाजिक, सांस्कृतिक तसेच शैक्षणिक क्षेत्रांत त्याचबरोबर चाणक्य मंडल परिवार या ठिकाणी स्वत:च्या कर्तृत्वाने जे अढळ स्थान निर्माण केलं, त्याचा हा लेखाजोखा!
- अविनाश धर्माधिकारी यांचे ‘अविनाशी’ कर्तृत्व या पुस्तकाद्वारे वाचकांपर्यंत पोहोचले आहे.
- अविनाश धर्माधिकारी यांची ‘व्यक्तिमत्त्वाकडून विभूतिमत्त्वाकडे’ होत असलेली वाटचाल या पुस्तकात चित्रित झाली आहे.
Be the first to review “आत्म्याचे नाव अविनाश”
You must be logged in to post a review.