अंगण विश्वाचे,अवकाश मनाचा

240.00260.00

जीवनाचे कुतूहल माणसाच्या जगण्याला दिशा देते, तर कधी गोंधळातही टाकते. बुद्धीला प्रश्न पडतात. रंग, रूप, आकार नसलेले ब्रह्मांड’ ही जर कल्पना असेल, तर आपल्या भोवतीचे हे विश्व कधी निर्माण झाले? जीवसृष्टीचा आरंभ तरी कसा झाला? कुठल्या वाटेने या प्रश्नांची उत्तरे शोधावीत? विज्ञानाच्या, धर्माच्या, इतिहासाच्या, अध्यात्माच्या, तत्त्वज्ञानाच्या की कलेच्या?

विज्ञानाने जनुकशास्त्रात केलेली प्रगती पाहून मनात येते, काही वर्षांतच असाध्य रोग नष्ट होऊन मनुष्य अमरत्व प्राप्त करेल; तर कधी भीती वाटते की, सत्तेच्या, पैशाच्या जोरावर जनुकीय प्रगतीचा वापर करून जगभर दहशतवादीच निर्माण होतील; पण माणसाची जनुके ठरतात तरी कशी? धर्माप्रमाणे? कलावंतांची जनुके वैज्ञानिकांच्या जनुकांपेक्षा वेगळी असतात का? महाभारतातल्या द्रोणाचार्यांचा जन्म आणि ‘टेस्ट- ट्यूब बेबी’ सारखे आधुनिक शोध पाहताना दंतकथा सत्य मानाव्यात का? अशा प्रश्नांच्या घोळात कादंबरीची नायिका नेमकी कशी अडकते आणि त्या प्रश्नकोशातून बाहेर पडते की नाही?

मनात विचारांचे वादळ आणि भावनांचे तीव्र कल्लोळ उठवणारी, अस्वस्थ मनाच्या अवकाशाला विश्वाच्या अंगणात समजूतदारपणे न्याहाळणारी एक आशयसमृद्ध कादंबरी….

Weight .25 kg
Dimensions 15 × 1 × 18 in

Customer Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “अंगण विश्वाचे,अवकाश मनाचा”