चौकट वाटोळी
‘चौकट वाटोळी’ ही कादंबरी मध्यमवर्गीय जगण्याची पठडी, आशा-अपेक्षा, नैतिक-अनैतिकतेच्या धारणा केंद्रित ठेवून बदलते कौटुंबिक वास्तव कवेत घेते. एका सामान्य मध्यमवर्गीय नोकरदार स्त्रीच्या जीवनात अपघाताने आलेला परपुरुष आणि त्यातून निर्माण झालेल्या वैयक्तिक आणि कौटुंबिक नात्यांतील गुंतागुंतीचा पट ही कादंबरी मांडते. ती मांडताना व्यक्तिगत सुख-मोह-इच्छा आणि चारित्र्य व सामाजिक प्रतिष्ठेच्या धारणांमधील संघर्ष ती अधोरेखित करते.
या कथानकाला विसाव्या शतकाच्या अखेरच्या काळाची म्हणजेच जागतिकीकरण ऐन उंबरठ्यावर उभे ठाकण्याच्या काळाची पार्श्वभूमी लेखकाने खुबीने रचली आहे. एक प्रकारे आज बदलत गेलेल्या समाजाच्या पाऊलखुणा या कादंबरीत दिसतात.
Be the first to review “चौकट वाटोळी”
You must be logged in to post a review.