Thumbnail

अविनाश कोल्हे हे एप्रिल 2017मध्ये मुंबईतील डी. जी. रूपारेल महाविद्यालयातून राज्यशास्त्राचे प्राध्यापक म्हणून निवृत्त झाले आहेत. त्यांनी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शैक्षणिक चर्चासत्रांमध्ये शोधनिबंध सादर केले आहेत. सध्या ते ‘चीनमधील मुस्लीम समाजातील अलगतेची भावना’ या विषयावर पीएच.डी. पदवीसाठी संशोेधन करीत आहेत. गेली 38 वर्षे त्यांनी ‘साप्ताहिक माणूस’च्या संपादनासह अनेक दिवाळी अंकांमध्ये आणि वृत्तपत्रांमध्ये लेखन केले आहे. त्यांनी ‘डॉ. मनमोहनसिंग यांचे चरित्र’ आणि ‘भारताची फाळणी’ ही दोन पुस्तके भाषांतरित केली असून, गोपाळ गणेश आगरकर यांचे चरित्रही लिहिले आहे. 2016मध्ये त्यांचा ‘रंगदेवतेचे आंग्लरूप ः मुंबईतील अमराठी रंगभूमी’ हा इंग्रजी व हिंदी नाटकांच्या परीक्षणांचा संग्रह आणि 2017मध्ये ‘सेकंड इनिंग’ हा दोन दीर्घकथांचा संग्रह प्रकाशित झाला आहे. ‘चौकट वाटोळी’ ही त्यांची पहिलीच कादंबरी आहे. स्वत:ला ओळखा जीवन घडवा