Thumbnail

मनोबी बंदोपाध्याय
भारतातील पहिल्या तृतीयपंथीय प्राचार्य म्हणून मनोबी बंदोपाध्याय यांनी पश्चिम बंगालमधील नाडिया जिल्ह्यातील कृष्णनगर महिला महाविद्यालयाची सूत्रे 9 जून 2015 रोजी हाती घेतली. हे पद त्यांना त्यांच्या गुणवत्तेच्या जोरावर मिळाले आहे. आपल्या समाजाला त्यांचे हेच सांगणे आहे- ‘शिका. जर आपण शिकलो, तरच आपल्या समस्या सुटतील.’
त्यांनी बंगाली साहित्यात डॉक्टरेट मिळवली आहे. झारग्रामच्या विवेकानंद शतवार्षिकी महाविद्यालयात त्यांनी ‘बंगालीच्या सहयोगी प्राध्यापक’ म्हणून काम केले आहे. 1995 साली त्यांनी बंगालीत पहिले तृतीयपंथी-विषयक नियतकालिक अबोमनोब (शुभमन) सुरू केले.
अंतहीन अंतरिन प्रोसितोभोर्तिका (न संपणारी गुलामी) हे बेस्ट सेलर ठरलेले पुस्तक त्यांच्या नावावर आहे. त्यांनी थर्ड जेंडर इन बंगाली लिटरेचर हे पुस्तकही लिहिले आहे.
सध्या त्या पश्चिम बंगाल सरकारच्या ‘पश्चिम बंगाल तृतीयपंथी विकास समिती’च्या उपाध्यक्ष आहेत. त्याचबरोबर, कल्याणी विद्यापीठाच्या व्यवस्थापन समितीच्या सदस्य आहेत.

Showing the single result