डॉ. अलीम वकील यांनी 33 वर्षे राज्यशास्त्राचे अध्यापन केले.
त्यांचे बारा ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. त्यांच्या ग्रंथांना महाराष्ट्र राज्य पातळीवरील सहा पुरस्कार मिळाले आहेत.
‘सूफी संप्रदायाचे अंतरंग’ या ग्रंथास रा. भि. जोशी, पद्मश्री विखे पाटील फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य तत्त्वज्ञान परिषदेचा गोएंका असे तीन पुरस्कार, तर मौलाना आज़ाद : धार्मिक आणि राजकीय विचार या ग्रंथास महाराष्ट्र साहित्य परिषदेचा शि. म. परांजपे आणि मराठवाडा साहित्य परिषदेचा म. भि. चिटणीस पुरस्कार आणि पुरोगामी लेखनासाठी सुगावा पुरस्कार मिळाले आहेत. ते 14व्या महाराष्ट्र राज्य राज्यशास्त्र – लोकप्रशासन परिषद, परभणीचे व 12व्या अखिल भारतीय मुस्लीम साहित्य परिषद, पुणेचे अध्यक्ष होते. ते महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमी, बालभारती, नागरिकशास्त्र संशोधन समिती, ‘इकॉनॉमिक स्टडीज’ (कोलकत्ता) या जर्नलच्या संपादक मंडळात सदस्य आहेत.

Showing the single result