Thumbnail

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात राहून लहानपणापासून वाचनाची आवड जोपासलेल्या राजेश हेन्द्रे यांचे इतिहास, काव्य आणि नाटक हे विशेष आवडीचे विषय आहेत. महाविद्यालयीन जीवनाच्या उंबरठ्यावर असतानाच त्यांनी यशवंतराव होळकर या ऐतिहासिक पुरुषावर ‘इथे विझली वीरश्री’ हे तीन अंकी ऐतिहासिक नाटक लिहिले होते. लहान वयापासूनच महाराष्ट्रातील प्रथितयश साहित्यिकांशी त्यांचा पत्रव्यवहार चालू होता. याच काळात सिडने शेल्डन यांच्या ‘ब्लडलाइन’ कादंबरीवर आधारित त्यांनी ‘सवाल एका शून्याचा’ हे व्यावसायिक नाटकही लिहिले. मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधील शिक्षण घेतल्यानंतर पुढे त्यांंनी पंधरा वर्षे त्या क्षेत्रात नोकरी केली. कालांतराने या क्षेत्रापासून फारकत घेऊन आपल्या आवडीच्या साहित्यक्षेत्राकडे वळण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि आता गेली दहा वर्षे ते ‘लोकमत’मध्ये संपादकीय विभागात कार्यरत आहेत. या काळात प्रसंगपरत्वे त्यांचे अनेक लेख आणि कविता प्रसिद्ध झाल्या आहेत.