डॉ. हिल्डा डेव्हिड ह्या सिम्बॉयोसिस कॉलेजमध्ये प्रोफेसर आहेत. पुणे विद्यापीठातून त्यांनी पीएच.डी प्राप्त केली आहे. रंगभूमी हा त्यांचा खास जिव्हाळ्याचा विषय आहे, त्यातूनच त्यांनी अनेक नाटकं दिग्दर्शित केली आहेत.
ईब्सेनबद्दल असलेल्या प्रचंड आवडीतून त्यांनी नॉर्वेजियन एम्बसी आणि एम. एम.एफ.ए.बरोबर काम करून पुण्यामध्ये ‘ईब्सेन’चा प्रचार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. इडिपस कॉम्प्लेक्सवर आधारित ‘द लास्ट ड्रीम’ ही कांदबरी त्यांनी लिहिली आहे. ‘द ब्राउन क्रिटिक’, डेबोनायर’,‘ सिटीझन’, ‘हेराल्ड ऑफ हेल्थ’ अशा त्यांच्या अनेक कथा पी.इ.एन.मध्ये प्रकाशित झाल्या आहेत. त्यांच्या बर्‍याच कथांचा हिंदी, उर्दू आणि कानडी भाषांमध्ये अनुवाद झाला आहे. भटकंती, वाचन, भन्नाट विचार, भेटीगाठी, विविध कला आणि तमाम प्राणिमात्र हे त्यांचे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

Showing the single result