डॉ. विद्यासागर पाटंगणकर हे बीडच्या बलभीम महाविद्यालयातून मराठी विभागप्रमुख व उपप्राचार्य म्हणून निवृत्त झाले आहेत. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या चर्चासत्रांत, राज्य-आंतरराष्ट्रीय स्तरांवरील अभ्यास-परिषदांमध्ये त्यांनी ‘वक्ता’ म्हणून सक्रिय सहभाग नोंदविला आहे. त्यांनी आकाशवाणी केंद्रावरून अनेक भाषणे दिली आहेत. आकाशवाणीसाठी ‘विवेकसिंधू’ व ‘पासोडी’चे लेखनदेखील केलेले आहे. अंकुरलेल्या, जनी जनार्दन, वेणुसुधा, अभंगवाणी- ज्ञानेश्वर ते तुकाराम, सगनभाऊच्या लावण्या-पोवाडे, श्लोक केकावली, लीळाचरित्र एकांक, बालेघाटी अक्षरलेणी, त्रिपुटी, मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा इतिहास, मराठी संत कवयित्रींचा इतिहास इत्यादी पुस्तकांचे लेखन त्यांनी केले आहे. नेकनूर येथील जिल्हा साहित्य संमेलनाचे 2011मध्ये त्यांनी अध्यक्षपददेखील भूषविले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि गुलबर्गा विद्यापीठ यांच्या अभ्यासमंडळावर सदस्य म्हणून त्यांनी काम केले आहे. यूजीसी अंतर्गत ‘महाराष्ट्रातील सूफी संप्रदाय’ हा बृहद्शोधप्रकल्प त्यांनी पूर्ण केला आहे. त्यांना मानाचे अनेक पुरस्कारदेखील मिळाले आहेत. सध्या ते दासोपंतांच्या ‘गीतार्णवा’च्या शब्दार्थ संदर्भकोशाचे ‘प्रमुख संपादक’ म्हणून कार्यरत आहेत.

Showing the single result