एक विठ्ठल नाम-वारकरी संप्रदाय- साहित्य आणि तत्त्वज्ञान

– Binding: Paperback
-ISBN13: 9789388424349
-Language: Marathi
-Publication Year: 2019
-Author: Dr. Vidyasagar Patangankar
-Product Code: VPG19266

240.00

‘एक विठ्ठल नाम’ वारकरी संप्रदाय : साहित्य व तत्त्वज्ञान

  • वारकरी संप्रदायाने महाराष्ट्राच्या संस्कृती व लोकजीवनावर टाकलेला प्रभाव उलगडून दाखविणारे पुस्तक.
  • संत नामदेव ते संत निळोबांपर्यंतच्या सर्व प्रमुख संतांचा परिचय करून देणारे पुस्तक.
  • वारकरी संप्रदायाने पुरस्कारलेल्या विठ्ठल दैवताचे योगदान उलगडून सांगणारे पुस्तक.
  • विठ्ठलनामाचा गजर ही महाराष्ट्रातील सामाजिक उत्थानाची, परिवर्तनाची प्रेरणा कशी ठरली, हे सांगणारे पुस्तक.
  • विठ्ठल नामाने आध्यात्मिक पातळीवर पारंपरिक भेदभावाची चौकट कशी मोडली, हे सांगणारे पुस्तक.
  • तत्कालीन धार्मिक, सामाजिक चौकटींना छेद देणार्‍या वारकरी संप्रदायाचे योगदान विशद करणारे पुस्तक.
डॉ. विद्यासागर पाटंगणकर हे बीडच्या बलभीम महाविद्यालयातून मराठी विभागप्रमुख व उपप्राचार्य म्हणून निवृत्त झाले आहेत. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या चर्चासत्रांत, राज्य-आंतरराष्ट्रीय स्तरांवरील अभ्यास-परिषदांमध्ये त्यांनी ‘वक्ता’ म्हणून सक्रिय सहभाग नोंदविला आहे. त्यांनी आकाशवाणी केंद्रावरून अनेक भाषणे दिली आहेत. आकाशवाणीसाठी ‘विवेकसिंधू’ व ‘पासोडी’चे लेखनदेखील केलेले आहे. अंकुरलेल्या, जनी जनार्दन, वेणुसुधा, अभंगवाणी- ज्ञानेश्वर ते तुकाराम, सगनभाऊच्या लावण्या-पोवाडे, श्लोक केकावली, लीळाचरित्र एकांक, बालेघाटी अक्षरलेणी, त्रिपुटी, मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा इतिहास, मराठी संत कवयित्रींचा इतिहास इत्यादी पुस्तकांचे लेखन त्यांनी केले आहे. नेकनूर येथील जिल्हा साहित्य संमेलनाचे 2011मध्ये त्यांनी अध्यक्षपददेखील भूषविले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि गुलबर्गा विद्यापीठ यांच्या अभ्यासमंडळावर सदस्य म्हणून त्यांनी काम केले आहे. यूजीसी अंतर्गत ‘महाराष्ट्रातील सूफी संप्रदाय’ हा बृहद्शोधप्रकल्प त्यांनी पूर्ण केला आहे. त्यांना मानाचे अनेक पुरस्कारदेखील मिळाले आहेत. सध्या ते दासोपंतांच्या ‘गीतार्णवा’च्या शब्दार्थ संदर्भकोशाचे ‘प्रमुख संपादक’ म्हणून कार्यरत आहेत.

Customer Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “एक विठ्ठल नाम-वारकरी संप्रदाय- साहित्य आणि तत्त्वज्ञान”