डॉ. ॐश्रीश श्रीदत्तोपासक यांचे संत साहित्य, अद्वैत वेदांत हे अभ्यासाचे विषय आहेत. ‘शंकराचार्य विरचित विवेकचूडामणी आणि यादवकालीन मराठी संतवाङ्मय’ या प्रबंधाच्या निमित्ताने त्यांना आंतरविद्याशाखीय अभ्यास करण्याची संधी मिळाली. संत नामदेव अध्यासनातील संशोधनकार्यामुळे संशोधनाला दिशा मिळाली. सुमारे 33 शोधप्रबंधिका, 50 वर लेख, ‘नाम याचे ठेवणे परिवारास लाभले’ हे पुस्तक, आकाशवाणीच्या कार्यक्रमांचे लेखन सिद्ध करता आले. लेखनाच्या माध्यमातून संत साहित्याचा सहवास लाभला. त्यामुळे घराण्यातील उपासनेला अभ्यासाची जोड देता आली. सकाळ वृत्तसमूहाचा ‘गुरुस्मरण पुरस्कार’, गुरुकुल प्रतिष्ठानचा ‘संत चोखामेळा पुरस्कार’, संत नामदेव शिंपी समाज सेवा मंडळ, सोलापूर यांचा ‘श्री संत नामदेव कार्य पुरस्कार’ आदी पुरस्कारांनी ते सन्मानित झाले आहेत.

Showing the single result