Thumbnail

शिवप्रसाद मंत्री हे मेकॅनिकल इंजिनिअर असून, अल्फा लाव्हल, सुत्झर इंडिया, टाटा टोयो व टाटा ऑटोकॉम्प इत्यादी आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये उपाध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी व अध्यक्ष या वेगवेगळ्या पदांवर 36 वर्षांहून अधिक वर्षे कार्यरत होते. सध्या ते विश्वकर्मा इन्स्टिट्यूटचे उपाध्यक्ष असून, उद्योग व विक्री व्यवस्थापन या विषयाचे प्राध्यापक आणि लहान व मध्यम उद्योग व्यवसायासाठी व्यवस्थापन सल्लागार (Consulting strategist) म्हणून कार्यरत आहेत. याचबरोबर दहा वर्षे त्यांनी निनाद बेडेकरांसमवेत इतिहासातून काय शिकता येईल यावर संशोधन व लिखाण केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज व थोरले बाजीराव पेशवे यांची ‘कालातीत व्यवस्थापन तत्त्वे’ या पुस्तकाचे त्यांनी एकत्रित लिखाण केले आहे. अवघ्या 3 महिन्यांत या पुस्तकाच्या विक्रमी 50,000हून अधिक प्रती विकल्या गेल्या आहेत. लवकरच सदर पुस्तक इंग्रजीमध्ये भाषांतरित होत आहे.
शिवतीर्थ रायगड ट्रस्टचे शिवप्रसाद मंत्री अध्यक्ष असून, स्वराज्याची राजधानी असणार्या रायगडाचे पुनर्निर्माण करून एक जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ म्हणून विकसित व्हावे म्हणून ते कार्यरत आहेत.
चौकट वाटोळी

Showing all 4 results