Thumbnail

डॉ. रामचंद्र देखणे हे प्रसिद्ध साहित्यिक, संतसाहित्याचे व लोकवाङ्मयाचे व्यासंगी अभ्यासक, व्याख्याते, प्रवचनकार, वारकरी कीर्तनकार, बहुरूपी भारूडकार म्हणून सुपरिचित आहेत. त्यांनी आजपर्यंत कथा, कादंबरी, बालसाहित्य, संतसाहित्य, चिंतनात्मक, संशोधनात्मक, वैचारिक आदी साहित्यप्रकारांमधून 45 ग्रंथांची निर्मिती केली आहे. त्यामध्ये गोरज, साठवणीच्या गोष्टी हे कथासंग्रह; भूमिपुत्र, गोपा-निनाद या कादंबर्या; आषाढी, दिंडी, ज्ञानदीप लावू जगी इत्यादी संतसाहित्य; बहुरूपी महाराष्ट्र, बहुरूपी भारूड, सुधारकांचा महाराष्ट्र, महाराष्ट्राचा लोकदेव खंडोबा इत्यादी लोकसाहित्य; नरसिंह, पर्यावरण बोध इत्यादी संपादित साहित्य; खरा श्रीमंत, करावे तसे भरावे, आपण चांगले तर इत्यादी बालसाहित्य या पुस्तकांचा समावेश होतो. त्यांच्या दोन पुस्तकांचे इंग्रजीत भाषांतरदेखील झाले आहे.

Showing all 2 results