Thumbnail

अ‍ॅड. डॉ. बाळ ज. बोठे पाटील हे गेली 28 वर्षे पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. दै. सकाळ या लोकप्रिय वृत्तपत्रात त्यांचा बातमीदार ते कार्यकारी संपादक असा महत्त्वपूर्ण प्रवास झाला आहे. तसेच त्यांनी वकिलीची सनदही प्राप्त केली आहे. पीएच.डी.चेही ते मानकरी आहेत. अनेक पुस्तकांचे लेखन त्यांनी केले आहे. पत्रकारितेसह विविध क्षेत्रांतील योगदानाबद्दल अनेक मानसन्मान त्यांना प्राप्त झाले आहेत.