Thumbnail

दत्तप्रसाद दाभोळकर हे मराठीतील ख्यातनाम लेखक आहेत. औद्योगिक संशोधन क्षेत्रात ते दीर्घकाळ सक्रिय होते. अत्युत्कृष्ट औद्योगिक संशोधनासाठी ‘फाय पुरस्कारा’चे ते मानकरी आहेत. ‘विज्ञानेश्वरी’, ‘बखर राजधानीची’, ‘प्रकाशवाटा’, ‘तुम्हाला विज्ञानयुगात जगायचंय’ ही त्यांची काही गाजलेली पुस्तके आहेत. त्यांचे ‘समग्र माते नर्मदे’ हे पुस्तक हिंदी, इंग्रजी व गुजराथी या भाषांमध्ये अनुवादित झाले आहे.