Thumbnail

35-36 वर्षे अध्यापनाच्या क्षेत्रात असणारे प्रा. डॉ. यशवंतराव पाटील हे बी.ए. (ऑनर्स) आणि एल.एल.बी. असून त्यांनी मराठी विषयाची पीएच.डी पदवी संपादन केली आहे.
वाचन आणि लेखन हे त्यांचे छंद असून त्यांनी वेगवेगळ्या साप्ताहिके, पाक्षिके, मासिके तसेच वर्तमानपत्रांतून विविध विषयावंर लेखन केले आहे. साप्ताहिक लोकांकुश व स्पर्धा परीक्षांसाठीचे मासिक ‘मार्गदीप’ यांचे ते संस्थापक-संपादकदेखील आहेत.
आत्तापर्यंत विविध विषयांवरचे त्यांचे साहित्य प्रकाशित झाले आहे. त्यामध्ये संस्काराच्या गोष्टी, जीवनाचे आध्यात्म, वेध मनाचा शोध सुखाचा यांसाख्या पुस्तकांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे तीन इंग्रजी पुस्तकांचेही लेखन त्यांनी केले आहे.

Showing all 3 results