संस्कारांचा अमृतकलश

-Binding: Paperback
-ISBN13: 9789386455673
-Language: Marathi
-Publication Year: 2018
-Author: Yashwantrao S. Patil
-Product Code: VPG18201

175.00

संस्कारांचा अमृतकलश

आजच्या एकविसाव्या शतकात चंगळवाद आणि भोगवाद यांच्या विळख्यात अडकलेल्या समाजाला संस्कारांचे अनन्यसाधारण महत्त्व सांगणारे हे पुस्तक आहे.
लेखक प्रा. डॉ. यशवंतराव पाटील यांनी प्रस्तुत पुस्तकामध्ये वेळेच्या संस्कारापासून ते अगदी आपल्या मनावरच्याही संस्कारांपर्यंतचा ऊहापोह केला आहे.
प्रत्येक संस्कार आणि त्याचे महत्त्व विशद करताना अनेक दाखल्यांसहित ते मांडल्याने आशयस्पष्टता सहजसोप्या रीतीने आली आहे. हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.
‘विचारांपेक्षा आचरण महत्त्वाचे’ हे सूत्र विशद करणार्या संस्कारदीपांची माळ आपल्याही आयुष्यात आशेचा प्रकाश निर्माण करेल, यात शंकाच नाही.

SKU: VPG18201
Categories:,
Brands
35-36 वर्षे अध्यापनाच्या क्षेत्रात असणारे प्रा. डॉ. यशवंतराव पाटील हे बी.ए. (ऑनर्स) आणि एल.एल.बी. असून त्यांनी मराठी विषयाची पीएच.डी पदवी संपादन केली आहे. वाचन आणि लेखन हे त्यांचे छंद असून त्यांनी वेगवेगळ्या साप्ताहिके, पाक्षिके, मासिके तसेच वर्तमानपत्रांतून विविध विषयावंर लेखन केले आहे. साप्ताहिक लोकांकुश व स्पर्धा परीक्षांसाठीचे मासिक ‘मार्गदीप’ यांचे ते संस्थापक-संपादकदेखील आहेत. आत्तापर्यंत विविध विषयांवरचे त्यांचे साहित्य प्रकाशित झाले आहे. त्यामध्ये संस्काराच्या गोष्टी, जीवनाचे आध्यात्म, वेध मनाचा शोध सुखाचा यांसाख्या पुस्तकांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे तीन इंग्रजी पुस्तकांचेही लेखन त्यांनी केले आहे.

Customer Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “संस्कारांचा अमृतकलश”