Thumbnail

नीलिमा बोरवणकर यांचे हे 11वे पुस्तक आहे. त्यांनी 100हून अधिक कथा लिहिल्या आहेत. विविध क्षेत्रांतल्या 200 व्यक्तींच्या मुलाखतींवरील त्यांचे पुस्तक प्रसिद्ध आहे. त्यांनी आकाशवाणी जाहिरातींसाठी लेखन, निवेदन, सूत्रसंचालन केले आहे. अनेक कार्यक्रमांत त्यांनी प्रकट मुलाखती घेतल्या आहेत. त्यांचे ‘रंगभान’, ‘झळाळ’, ‘भवताल’ हे कथासंग्रह, ‘कार्डीओग्राम’, ‘निजखूण’, ‘गाज’ या कादंबर्या आणि ‘आम्ही मायदेशी’, ‘मुलं दूरदेशी’ इत्यादी पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांना म. सा. प., पुणे मराठी ग्रंथालय, नाशिक सार्वजनिक वाचनालय, तसेच महाराष्ट्र राज्य शासनाचा पुरस्कारदेखील मिळाला आहे.

Showing the single result