Sandeep Tapkir

Thumbnail

संदीप भानुदास तापकीर हे एम.ए.(इतिहास व मराठी) असून, त्यांनी महाराष्ट्रातील 350 पेक्षा अधिक किल्ल्यांना भेटी दिल्या आहेत. दुर्गअभ्यासक, शिवव्याख्याते म्हणून ते प्रसिद्ध आहेत. यापूर्वी त्यांचे ‘महाराजांच्या जहागिरीतून… पुणे जिल्ह्यातील 29 किल्ले’ हे पुस्तक (फोटो, नकाशे, इतिहासासह) 2012 मध्ये शिवराज्याभिषेक दिनी (6 जून) स्वराज्याची राजधानी रायगडावर प्रकाशित झाले आहे. त्यांनी युवकांसाठी लिहिलेले ‘छत्रपती श्री शिवराय’ हे शिवाजीमहाराजांचे चरित्र प्रकाशित झाले आहे.
त्यांनी सहाय्यक संपादक या नात्याने महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या ‘मराठी शब्दकोश’ या प्रकल्पात शब्दकोश खंड 4, 5 व 6 या तीन खंडांचे काम केले आहे.
2012 पासून ‘दुर्गांच्या देशातून…’ हा दिवाळी अंक ते संपादित करत आहेत. याद्वारे त्यांनी महाराष्ट्रातील किल्ल्यांबाबत मराठी दिवाळी अंकांमध्ये असलेली उणीव दूर केली आहे. याशिवाय दुर्गसंवर्धन नेमके कसे करावे यासाठी काढलेल्या ‘दुर्गसंवर्धनाची पहाट…’ या स्मरणिकेचेही त्यांनी संपादन केले आहे.

Showing the single result