Thumbnail

सोनिया मकवाणी ह्या मानसिक स्तरावर जाऊन अंतःप्रेरणेच्या माध्यमातून उपचार करतात. त्यांनी क्लिनिकल सायकॉलॉजी – क्लिनिकल हिप्नोथेरपी ह्यामध्ये पदविका मिळवली आहेे. मार्गदर्शक, शिक्षक आणि उपचारक ह्या माध्यमांतून काम करत असताना त्या आता जगभर उपचार देण्याघेण्याचं प्रशिक्षणदेखील देतात. आठव्या इंद्रियाची जाणीव-जागृती करणार्या ‘मास्टर रिकनेक्शन प्रोसेस’ ह्या कार्यक्रमाच्या त्या सक्रिय संस्थापक आहेत. ह्याशिवाय, त्या स्वतंत्र लिखाणदेखील करतात. ‘टचिंग लाइव्ह्ज वेलफेअर ट्रस्ट’ ह्या नावाने त्यांनी एक सेवाभावी संस्था सुरू केली. मुलांचे शिक्षण आणि संपूर्ण व्यक्तिमत्त्वाच्या दृष्टीने ही संस्था काम करते.