Thumbnail

अंजली कुलकर्णी या मराठी साहित्यात एम. ए. झालेल्या आहेत. तसेच त्यांनी एल. एल. बी. देखील केलेले आहे. बँक ऑफ इंडियामधून त्यांनी 2014मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. त्या मराठीतील एक प्रसिद्ध कवयित्री व लेखिका आहेत. त्यांची आजवर 12 पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यामध्ये मी एक स्त्रीजातीय अस्वस्थ आत्मा, संबद्ध, बदलत गेलेली सही, रात्र, दुःख आणि कविता हे चार काव्यसंग्रह, हृदयस्पर्शी व संभ्रमाच्या पाण्यात गटांगळ्या हे दोन ललितलेखसंग्रह, स्त्री स्वत्वाचा शोध व स्त्री प्रश्न- एक आवर्त हे दोन वैचारिक लेखसंग्रह यांचा समावेश आहे. पोलादाला चढले पाणी ही त्यांनी अनुवादित कादंबरी व अस्वस्थ शतकाच्या कविता, रक्तहीन क्रांती, समग्र ही त्यांची संपादित पुस्तके प्रसिद्ध आहेत. एस. एस. सी. बोर्डाच्या इंग्रजी माध्यमाच्या पुस्तकात त्यांच्या ‘रंग मजेचे रंग उद्याचे’ या कवितेचा समावेश झाला आहे. त्याचबरोबर हिंदी, इंग्लिश, नेपाळी या भाषांमधून त्यांच्या कवितांचे अनुवाद प्रकाशित झाले आहेत. तसेच बदलत गेलेली सही हा कवितासंग्रह पुणे विद्यापीठात एम. ए. मराठी (स्वायत्त) अभ्यासक्रमात (2013-2016) समाविष्ट झाला आहे.

Showing the single result