Description
युद्धामागील विज्ञानशास्त्र जाणून घ्या. तीव्र राजकीय चर्चा आणि फिसकटलेल्या वाटाघाटींच्या नाट्यात रंगून जा. सर्वोत्कृष्ट युद्धनीतिकार असलेल्या कृष्णाकडून रणनीती समजून घ्या आणि त्याच्या सहकाऱ्यांवर, तसेच प्रतिस्पर्ध्यावर तो रचत असलेल्या तात्त्विक व मानसशास्त्रीय डावपेचांचा अनुभव घ्या. इंद्रप्रस्थाच्या राजघराण्यातील स्त्रियांसह माहिती संकलनाची नाजूक कला आणि सैनिकांना आवश्यक तांत्रिक मदत पुरवण्याच्या कार्याचा मागोवा घ्या.
युद्धाचे माहात्म्य आणि त्यातील भीषणता, निंदनीय भ्याडपणा आणि अद्भुत शौर्य, नीतिशास्त्र आणि नैतिकता या सर्वांचा शोध घ्या. महिलांचे सक्षमीकरण, लैंगिक समानता आणि विवाहित मुलींना माहेरचा मिळणारा आधार यांसारख्या सातत्याने हाताळण्यात येणाऱ्या विषयांसोबतच, या भागात अधोरेखित केलेल्या दिव्यांग व्यक्तींच्या समावेशकतेचे महत्त्व ओळखा. महाभारताच्या या आधुनिक व काल्पनिक पुनर्निर्मितीत अशा लोकांच्या अनोख्या योगदानाला समजून, आजच्या काळात उपयुक्त पडतील, असे धडे यातून घ्या.
इंद्रप्रस्थाच्या या करारी साम्राज्ञीसोबत पुढची वाटचाल सुरू ठेवा, जेव्हा कुरुक्षेत्रात योद्धे समोरासमोर येऊन करतात एक विध्वंसक रक्तपात !






Reviews
There are no reviews yet.