होय मी स्त्री आहे!

– Binding: Paperback
-ISBN13: 9789386455536
-Language: Marathi
-Publication Year: 2018
-Author: Manobi Bandyopadhyay
-Product Code: VPG18185

200.00

होय, मी स्त्री आहे!

आपली ओळख आणि नवीन मापदंड निर्माण करत असतानाचा, एका तृतीयपंथी व्यक्तीचा असामान्य आणि धाडसी प्रवास या पुस्तकात चित्रित झाला आहे.
लहानपणापासूनच जाणवत गेलेले शारीरिक वेगळेपण, इथपासून ते एका महाविद्यालयाचे प्राचार्यपद संपादन करणे इथपर्यंतचा मानोबि बंदोपाध्याय यांचा जीवनप्रवास अतिशय मोकळेपणाने समोर येत जातो. अनेक अडथळ्यांना तोंड देत असतानासुद्धा शिक्षणाची कास मात्र त्यांनी कधीच सोडली नाही. आणि त्या जोरावरच प्राचार्यपद मिळवून स्वत:ची वेगळी ओळख त्यांनी निर्माण केली. हे सगळे होत असताना एका पुरुषाच्या स्त्रीमधल्या रूपांतराचीही सुन्न करणारी कहाणी आपल्यासमोर उलगडत जाते.
निखळ प्रामाणिकतेने आणि सखोल संवेदनशीलतेने त्यांनी ही कहाणी शब्दबद्ध केलेली आहे. मानोबि यांनी स्वत:ची ओळख निर्माण करण्यासोबतच संपूर्ण समाजाला जी प्रेरणा दिली, त्याचे चित्रण ही कादंबरी करते

Brands
मनोबी बंदोपाध्याय भारतातील पहिल्या तृतीयपंथीय प्राचार्य म्हणून मनोबी बंदोपाध्याय यांनी पश्चिम बंगालमधील नाडिया जिल्ह्यातील कृष्णनगर महिला महाविद्यालयाची सूत्रे 9 जून 2015 रोजी हाती घेतली. हे पद त्यांना त्यांच्या गुणवत्तेच्या जोरावर मिळाले आहे. आपल्या समाजाला त्यांचे हेच सांगणे आहे- ‘शिका. जर आपण शिकलो, तरच आपल्या समस्या सुटतील.’ त्यांनी बंगाली साहित्यात डॉक्टरेट मिळवली आहे. झारग्रामच्या विवेकानंद शतवार्षिकी महाविद्यालयात त्यांनी ‘बंगालीच्या सहयोगी प्राध्यापक’ म्हणून काम केले आहे. 1995 साली त्यांनी बंगालीत पहिले तृतीयपंथी-विषयक नियतकालिक अबोमनोब (शुभमन) सुरू केले. अंतहीन अंतरिन प्रोसितोभोर्तिका (न संपणारी गुलामी) हे बेस्ट सेलर ठरलेले पुस्तक त्यांच्या नावावर आहे. त्यांनी थर्ड जेंडर इन बंगाली लिटरेचर हे पुस्तकही लिहिले आहे. सध्या त्या पश्चिम बंगाल सरकारच्या ‘पश्चिम बंगाल तृतीयपंथी विकास समिती’च्या उपाध्यक्ष आहेत. त्याचबरोबर, कल्याणी विद्यापीठाच्या व्यवस्थापन समितीच्या सदस्य आहेत.

Customer Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “होय मी स्त्री आहे!”