जगू आनंदे
‘जगू आनंदे’ हे पुस्तक मानसशास्त्र आणि व्यवस्थापनशास्त्र यांवर आधारित आहे. पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांना शिकवत असताना, त्यांच्या बाबतींतल्या विविध समस्या आणि मानसशास्त्रीय दृष्टिकोनाच्या साहाय्याने त्यांची उकल करण्यासाठी लेखकाने योजलेले उपाय ह्या गोष्टी अधोरेखित करणारे हे पुस्तक आहे. मानवी वर्तनावर आधारित समस्यांबाबतचे सामान्य जनांचे गैरसमजही या पुस्तकद्वारे दूर होण्यास मदत होते. विविध समस्या दूर होऊन जीवन आनंदाने जगता यावे, यासाठी मौलिक मार्गदर्शन करणारे हे पुस्तक आहे. तसेच सामान्य जनांना मानसशास्त्रीय संकल्पनाही या पुस्तकाच्या साहाय्याने चांगल्या रीतीने स्पष्ट होतात. मन आणि वर्तन यांच्या सुसंवादाचा उत्कृष्ट मंत्र हे पुस्तक देते.
* मानसशास्त्र आणि व्यवस्थापनशास्त्र यांवर आधारित पुस्तक.
* विविध वर्तनसमस्या आणि त्याचे निराकरण यादृष्टीने महत्त्वपूर्ण बाबी उलगडणारे पुस्तक.
* मानसशास्त्रीय संकल्पनांच्या आधारे समस्यांची उकल करून मन आणि वर्तन यांच्या सुसंवादाचा मंत्र देणारे
Be the first to review “जगू आनंदे”
You must be logged in to post a review.