Jani Janardhan- विंचूदंशावरील लसीचे प्रवर्तक ‘जनी जनार्दन’ डॉ. श्रीधर ऊर्फ़ तात्यासाहेब नातू यांचे चरित्र

650.001,299.00

श्री. नितीन गडकरी यांच्या अनमोल प्रस्तावनेतून…
(केंद्रीय मंत्री, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय)

✅ विंचूदंशावरील लसीचे प्रवर्तक
‘जनी जनार्दन’ : डॉ. श्रीधर ऊर्फ़ तात्यासाहेब नातू यांचे चरित्र

देवमाणूस म्हणून प्रसिद्ध असलेले विंचूदंशावरील लसीचे प्रवर्तक,माजी आमदार कै. डॉ. श्रीधर दत्तात्रय उपाख्य
तात्यासाहेब नातू यांचा जीवनपट या चरित्रलेखनातून त्यांच्या अनेक वैशिष्ट्यांसह सामोरा येत आहे. त्या काळी
विंचवाच्या दंशामुळे होणारे आजार व मृत्यू यांवर योग्य उपचार होण्यासाठी तात्यासाहेबांनी प्रचंड परिश्रम घेतले.
विविध भूमिकांमध्ये समाजासाठी काम करीत राहिलेल्या तात्यासाहेबांचे काम आता दंतकथा वाटावे, इतक्या विलक्षण
घटनांनी भरलेले आहे. त्या साऱ्यांचे संकलन या चरित्राच्या निमित्ताने करण्यात या पुस्तकाचे लेखक श्री. धीरज
वाटेकर यांना यश आले आहे. संदर्भांची रेलचेल असलेला हा अवडंबरहीन व रसाळ दस्तावेज आहे. सर्वार्थाने सार्थक
असलेले ध्येयवेड्या, निष्ठावेड्या लोकसेवकाचे जीवन कसे असते, याचा वस्तुपाठ या चरित्राच्या निमित्ताने असंख्य
वाचकांच्या समोर जात आहे, याबद्दल मी अतिशय समाधानी आहे. तात्यासाहेबांसारखी लोकविलक्षण व्यक्तिमत्त्वे
व्यक्ती, कुटुंबे आणि समाजाच्या कल्याणासाठी स्वत:च्या अद्वितीय गुणांचा निःस्वार्थ वापर करतात. अशा
व्यक्तिमत्त्वांमध्ये केवळ इच्छा असून चालत नाही. त्यांच्यात सहानुभूती, करुणा, लवचीकता, समर्पण, संवाद-विश्लेषण
व समस्या सोडवण्याची कौशल्ये असे सगळे असावे लागते. ते सारे तात्यासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वात होते, याचा
प्रत्ययकारी अनुभव जनी जनार्दन वाचताना येतो.

– श्री. नितीन गडकरी
(केंद्रीय मंत्री, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय)
——————————————————

✅ पुस्तकाविषयी :

✔️ भारत सरकारच्या ‘हाफकिन’ या संस्थेने शोधलेल्या विंचूदंशावरील लसीचे ‘प्रवर्तक’ आमदार डॉ. श्रीधर दत्तात्रय उर्फ तात्यासाहेब नातू या दैवी अंश लाभलेल्या डॉक्टरांचे हे जीवनचरित्र आहे.
✔️विंचूदंशावरील लसीच्या निर्मितीची कहाणी वाचकांना प्रथमच उपलब्ध.
✔️एखादा ‘आमदार’ हा ‘देवमाणूस’ असू शकतो, हे सांगून कदाचित आजच्या पिढीला खरं वाटणार नाही. पण हे सत्य सांगणारे हे चरित्र आहे.
✔️आजच्या काळात उद्ध्वस्त होत असलेल्या, भारतीय संस्कृतीने उदात्त ठरवलेल्या मूल्यव्यवस्थेचे दर्शन घडविणारे चरित्र.
✔️ध्येयवेड्या, निष्ठावेड्या लोकसेवकाचे जीवन कसे असते? याचा वस्तुपाठ घडविणारे चरित्र.
✔️आजच्या काळात दंतकथा वाटाव्यात इतक्या विलक्षण घटनांनी भरलेले व संदर्भांची रेलचेल असलेला अवडंबरहीन व रसाळ दस्तावेज म्हणजे हे
चरित्र आहे.
✔️आजच्या काळात उद्ध्वस्त होत असलेल्या, भारतीय संस्कृतीने उदात्त ठरवलेल्या मूल्यव्यवस्थेचे दर्शन घडविणारे चरित्र
✔️विसाव्या शतकातील ग्रामीण कोकणचे प्रतिनिधित्व करणारे चरित्र
संदर्भांची रेलचेल असलेला अवडंबरहीन व रसाळ दस्तावेज.

———————————————————————————————
✅ लेखकांविषयी :

✔️लेखक धीरज वाटेकर हे कोकणच्या विकासासाठी प्रयत्नशील ‘पर्यटन-पर्यावरण’ चळवळीतील कार्यकर्ते आहेत.
✔️त्यांची चिपळूण तालुका पर्यटन, श्री परशुराम तीर्थक्षेत्र दर्शन (मराठी व इंग्रजी), श्रीक्षेत्र अवधूतवन, ठोसेघर पर्यटन ही पाच पर्यटनविषयक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत.
✔️‘ग्रामसेवक ते समाजसेवक : दत्ताराम (आबा) महाडिक’, ‘प्राथमिक शिक्षणातील कर्मयोगी :: मो. म. परांजपे’, ‘कृतार्थीनी :: कमल श्रीकांत भावे’ ही तीन चरित्र लेखने प्रसिद्ध झाली आहेत.
✔️कोकण इतिहास संशोधक स्व.अण्णासाहेब शिरगावकर यांच्या ‘गेट वे ऑफ दाभोळ’ आणि ‘वाशिष्टीच्या तीरावरून’ या दोन संशोधित ग्रंथांची निर्मिती आणि ‘व्रतस्थ’ पुस्तकाचे संपादन त्यांनी केले आहे.
✔️त्यांनी संपूर्ण कोकणच्या संशोधित नकाशाची निर्मिती व संपादन केले आहे.
✔️‘पत्रकार’ म्हणून गेली २५ वर्षे ते राज्यभरातील विविध नियतकालिकातून सातत्याने लेखन करत आहेत.
✔️कोकण इतिहास व संस्कृती, ग्रंथ चळवळ, पर्यटन, निसर्ग आणि पर्यावरण आदी सामाजिक जागृतीपर विषयातही कार्यरत आहेत.

Weight .900 kg
Dimensions 6 × 2 × 9 in

Customer Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Jani Janardhan- विंचूदंशावरील लसीचे प्रवर्तक ‘जनी जनार्दन’ डॉ. श्रीधर ऊर्फ़ तात्यासाहेब नातू यांचे चरित्र”