कलीचा उदय
महाभारतात आजपर्यंत कायमच खलनायकाच्या रुपात दुर्योधन, तर पांडव सदाचारी व सच्छिल स्वरूपात दिसतात. मात्र, खलनायक दुर्योधनाला आनंद नीलकंठन यांनी या पुस्तकातून नायकाच्या रुपात दाखवले आहे. त्यामुळे, दुर्योधनाच्या नजरेतून आपल्याला महाभारत नव्याने समजते. कलियुगाच्या उदय मध्ये महाभारतातील सर्वच व्यक्तिरेखांची तपशीलवार पुनर्मांडणी केलेली आहे. यामध्ये श्रीकृष्ण देवस्वरूपात, भव्य प्रतीमेचा दाखवलेला नाही. तर उलट त्याच्यावर शिशुपाल, सुयोधन, गांधारी, बलराम यांनी केलेल्या टीकेचा लेखकाने चतुराईने वापर केलेला आहे. कर्णाची निष्ठा, मित्र प्रेम; एकलव्य, अश्वत्थामा यांची सुयोधनाशी असणारी बांधिलकी, धृतराष्ट्राचा ज्येष्ठ पुत्र युयुत्सूची व्यापारी वृत्ती, परशुराम- कृष्ण संबंध आदी अनेक गोष्टी नव्याने समजतात.
Be the first to review “कलीचा उदय”
You must be logged in to post a review.