काय बोलावं? कधी बोलावं?

– Binding : Paperback
– ISBN13 : 9789386455154
– Language : Marathi
– Publication Year : 2017
– Author: Rakesh Godhwani
– Product Code: VPG17161

325.00

काय बोलावं? कधी बोलावं?

काय बोलावं? कधी बोलावं?हे मनपरिवर्तनासाठी संवाद कसा साधावा यावर आधारित असलेलं पुस्तक असून, उद्योगजगतातील व्यक्ती, विद्यार्थी, उद्योजक यांसाठीच नव्हे, तर आपल्या श्रोत्यांवर कायमचा प्रभाव निर्माण करू इच्छिणार्‍या कोणत्याही व्यक्तीसाठी उपयुक्त आणि संवाद साधणारं पुस्तक आहे. व्यावहारिक स्वरूपाचा अएखजण दीींर ए आराखडा आणि महात्मा गांधी, मलाला युसूफझाई, स्टीव्ह जॉब्ज, मार्टिन ल्युथर किंग, जे. के. रोलिंग यांसारख्या प्रेरणादायी नेत्यांच्या उदाहरणांच्या माध्यमातून हे पुस्तक मनपरिवर्तनाची कला शिकण्यासाठी, एक प्रभावी वक्ता होण्यासाठी तुमची मदत करेल.

राकेश गोधवानी यांनी लिहिलेल्या या पुस्तकातून तुम्ही काय शिकाल

  • श्रोत्यांना कसे जिंकावे व कसे कृतिशील बनवावे?
  • नोकरीसाठी मुलाखत कशी द्यावी?
  • व्यवसायाशी संबंधित बाबींचे प्रभावी सादरीकरण कसे करावे?
  • संवादातून ग्राहकाला कसे जिंकावे?
  • गुंतवणूकदाराला गुंतवणुकीसाठी कसे आकर्षित करावे?
  • आपले उत्पादन एखाद्या ग्राहकाला कसे विकावे?
  • व्यावसायिक आणि सामाजिक संपर्क कसे वाढवावेत?
  • वादविवाद, संघर्ष कसे सोडवावेत?
Brands
राकेश गोधवानी स्वत:ची ओळख छेलेवू अशीच करून देतात. विप्रो, इंटेल आणि क्वॉलकॉम यांसारख्या मोठ्या संस्थांमध्ये त्यांनी करिअरची सुरुवातीची सुंदर वर्षं व्यतीत केली. त्यानंतर त्यांनी विक्री, विपणन (मार्केटिंग) आणि व्यवसाय विकास यांमध्ये विविध भूमिकाही बजावल्या आहेत; राकेश सध्या आय.आय.एम., बंगळुरू येथे माजी विद्यार्थी संघटनेच्या प्रमुख पदावर कार्यरत आहेत. उच्च तंत्रज्ञान क्षेत्रातल्या उद्योजकांना व नेत्यांना ते प्रशिक्षण देतात. आय.आय.एम. बंगळुरू इथं मॅनेजेरियल कम्युनिकेशन अँड कम्युनिकेशन फॉर लिडर्स हा विषय ते शिकवतात.

Customer Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “काय बोलावं? कधी बोलावं?”