खगोल अभ्यासक जयंत नारळीकर

-Binding: Paperback
-Language: Marathi
-ISBN:9789390869336
-Publication Year: 2021
-Author: Dr. Chitralekha Purandare
-Product Code: VPG19221

170.00

खगोल अभ्यासक जयंत नारळीकर

डॉ. जयंत नारळीकर हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे खगोलशास्त्रज्ञ. डॉ. फ्रेड हॉयेल या आपल्या गुरूंच्या साथीत नारळीकरांनी गुरुत्वाकर्षणाचा नवा क्रांतिकारक सिद्धांत मांडला, जो ‘हॉयेल-नारळीकर सिद्धांत’ म्हणून ओळखला जातो. त्यांच्या या असामान्य कर्तृत्वामुळे वयाच्या अवघ्या २७व्या वर्षी त्यांना तत्कालीन राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते ‘पद्मभूषण’ या किताबाने गौरविण्यात आले. खगोलविज्ञानातील त्यांच्या संशोधनकार्याबद्दल भारताचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च सन्मान ‘पद्मविभूषण’ त्यांना बहाल करण्यात आला. वैज्ञानिक संशोधनाबरोबरच विज्ञान लेखक म्हणूनही ते नावाजले आहेत. अशा या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाची प्रेरणादायी जीवनकहाणी या पुस्तकात सांगितली आहे.