Kridapatu Te Kridamaharshi Yashogatha-क्रीडापटू क्रीडामहर्षी यशोगाथा -वळणावळणांवर जगवणारी आणि जागवणारी माणसं

  • Publisher ‏ : ‎ Vishwakarma Publications; First Edition (24 December 2024)
  • Language ‏ : ‎ Marathi
  • Perfect Paperback ‏ : ‎ 231 pages
  • ISBN-10 ‏ : ‎ 9389624851
  • ISBN-13 ‏ : ‎ 978-9389624854
  • Reading age ‏ : ‎ 10 years and up
  • Item Weight ‏ : ‎ 125 g
  • Dimensions ‏ : ‎ 14 x 1.2 x 21 cm
  • Packer ‏ : ‎ Vishwakarma Publications
  • Generic Name ‏ : ‎ Books

280.00350.00

रुवर्य डॉ. अरुण दातार म्हणजे शरीरसौष्ठवजन उचलणे, पॉवर लिफ्टिंग, सूर्यनमस्कार या क्षेत्रांतील एक उत्तुंग व्यक्तिमत्व आणि वने आर्ट या क्रीडाप्रकाराचे जनका आई-वडिलांचे उत्तम संस्कार, गुरुवयांचे उत्कृष्ट मार्गदर्शन आणि मित्रमंडळींचे उत्कट प्रेम या त्रिवेणी संगमातून त्यांनी विद्यार्थिदशेतच अनेक बक्षिसांसह क्रीडापटू म्हणून अभिनंदनीय कामगिरी केली.
विवाहानंतर झालेल्या भीषण अपघातात होत्याचं नव्हतं झालं सुड शरीर कायमचं जायबंदी झालं, परंतु भेटलेली देवमाणसं, कमालीची सहनशीलता आणि सुविद्य पत्नीनं शुश्रूषेसह दिलेलं मानसिक पाठबळ यांमुळे त्यांच्या जीवनाला कलाटणी मिळाली.
पुढे पत्नीच्या आग्रहामुळे व्यायामशाळा हेच जीवितकार्य मानून शेकडो कीडापटू घडवले. त्यांच्या विद्यार्थ्यांनी पुणे श्री ते विश्व श्री असं यश संपादन करत सूर्ण जिमची कीर्ती सर्वदूर पोहोचवली. यथावकाश सरांनाही अनेक पुरस्कारांसह क्रीडामहर्षी पदवी प्राप्त झाली. अर्थात, हा प्रवास सोपा नव्हताच. नित्य नवा संघर्ष असला, तरी असंख्यांच्या जीवनात हर्ष पेरून, आपलं बोनस आयुष्य राष्ट्रकार्यासाठी समर्पित करणारे डॉ. अरुण दातार आणि संतसाहित्य समरसून जगणाऱ्या गुरुवर्या डॉ. आरती दातार या दाम्पत्याने वळणावळणांवर भेटलेल्या मदतीच्या हातांचा ओघवत्या शैलीत परामर्श घेतला आहे.
व्यायामातून आत्मविश्वास, जिद्द, चिकाटी, विवेक, शिस्त, सहकार्य, संयम, सातत्य, साधना, साहस, सेवा अशा नानाविध वैश्विक मूल्यांचं संस्करण असलेले हे हा शब्दधन प्रत्येकासाठी प्रेरक आहे. शक्ती आणि भक्तीचं प्रतीक आहे. दातृत्व आणि दूरदृष्टीचं द्योतक आहे. कृतार्थता आणि कृतज्ञतेचा परिपाक आहे. म्हणूनच ‘क्रीडापटू ते क्रीडामहर्षी ही यशोगाथा नक्कीच संग्राह्य आहे. डॉ. लता पाडेकर (संत साहित्याच्या अभ्यासक)

Customer Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Kridapatu Te Kridamaharshi Yashogatha-क्रीडापटू क्रीडामहर्षी यशोगाथा -वळणावळणांवर जगवणारी आणि जागवणारी माणसं”