डॉ. सो. रा. शेडे फुले संस्कृतीला ‘बहुजन संस्कृती’ म्हणतात. सत्यशोधक चळवळीची क्रांतिकारकता दोन शब्दांत सांगायची म्हटले तर, सध्याच्या भारतीय संविधानाचे ‘ब्रीदवाक्य ‘सत्यमेव जयते’ आहे आणि फुल्यांनी सार्वजनिक सत्यधर्माची मांडणी करताना सुरुवातीलाच ‘सत्यमेव जयते’ असा नारा दिलेला आहे.
महाराष्ट्रातील सत्यशोधक चळवळीने केलेली मानसिक व वैचारिक मशागत अत्यंत मूलगामी आहे आणि तिची आज नितांत गरज आहे. भारतीय संविधानाने स्वीकारलेली स्वातंत्र्य, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता, विज्ञाननिष्ठा, लोकशाही, समाजवाद इत्यादी मूल्ये रुजविण्यासाठी सत्यशोधक चळवळीची नितांत गरज आहे. डॉ. सो. रा. शेंडे यांचे हे पुस्तक या दिशेने टाकलेले एक पाऊल वाटते.
डॉ. बाबा आढाव (ज्येष्ठ समाजवादी नेते)
Be the first to review “Maharashtrachi Phule Sanskruti arthat Bahujan Sanskruti-महाराष्ट्राची फुले संस्कृती अर्थात बहुजन संस्कृती”
You must be logged in to post a review.