नियोजन करिअरचे – 10 वी, 12वी नंतरचे
आजच्या जागतिकीकरणाच्या काळात विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या अमर्याद संधी उपलब्ध आहेत. त्यांमधून योग्य करिअरची निवड करणे ही खरोखरच आव्हानात्मक गोष्ट बनली आहे. त्या दृष्टीने आवश्यक असे मार्गदर्शन या पुस्तकातून मिळते.
विद्यार्थ्यांना 10वी आणि 11वी नंतर उपलब्ध असणार्या वेगवेगळ्या ज्ञानशाखांची माहिती देऊन योग्य पर्यायनिवडीस हे पुस्तक मदत करते. त्या अनुषंगाने बुद्धिमापन चाचणीचे महत्त्व आणि विशिष्ट ज्ञान संपादन करण्यासाठीच्या आवश्यक असणार्या क्षमता या गोष्टीसुद्धा माहीत होतात.
करिअरच्या वेगवेगळ्या वाटा, प्रवेश-परीक्षा, त्यांच्या पात्रतेचे निकष त्याचबरोबर ध्येयनिश्चिती, वेळेचे नियोजन आदि कौशल्यांचेही सर्वांच्याच दृष्टीने असणारे महत्त्व अशा घटकांसंदर्भातला समग्र लेखाजोखा पुस्तकात घेतला आहे.
योग्य करिअर निवडू इच्छिणार्या प्रत्येकाच्याच संग्रही असावे, असे हे पुस्तक आहे.
Be the first to review “नियोजन करिअरचे – १०वी, १२वीनंतरचे”
You must be logged in to post a review.