प्रकाश पेरण्यासाठी खजिना नाट्यछटांचा या आकर्षक शीर्षकाच्या नाट्यछटांमधील विषय आणि भाषा शालेय विद्यार्थ्यांना सवयीचे आहेत व ते अत्यंत रंजक पद्धतीने सांगितलेले आहेत. कधी मुलांच्या लेखनात अनवधानाने होणाऱ्या चुका नाट्यछटेद्वारे सांगितल्याने शिक्षण आनंददायी होण्यास मदत होते. अनेक नाट्यछटा या पर्यावरणाशी नाते जोडण्यास मदत करणाऱ्या आहेत.
प्रत्येक नाट्यछटेचे वेगळेपण या पुस्तकात जाणवते. कधी पणतीविषयी संवाद आहे; तर कधी पतंग आणि मुलगा यांचा संवाद होतो. कधी खुर्ची आणि प्रेक्षक; तर कधी मुलांना आवडणाऱ्या नाण्यापक्ष्यांचीही लुडबुड काही नाट्यछटांतून वाचायला मिळते. हे येथे वर्णन करण्यापेक्षा शालेय विद्यार्थीच नव्हे, तर सर्व शिक्षक, पालक, उच्चस्तरीय शाळाचालक व शिक्षण व्यवस्थेतील धोरणे आखणाऱ्या उच्चपदस्थ अधिकारी वर्गाने या नाट्यछटा जरूर वाचाव्यात. त्यातून मोठ्यांनाही मार्गदर्शन होईल.
डॉ. लता पाडेकर या उच्चशिक्षित प्राथमिक शालेय स्तरावर सुमारे तीस वर्षांहून अधिक काळ पुणे महानगरपालिकेमध्ये प्रयोगशील आणि प्रयत्नशील शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. कोणताही प्रयोगशील शिक्षक नियमित अभ्यास विषय स्वतः अधिकात अधिक अभ्यास करून रंजकपणे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीत असतो. एका अर्थाने तो शिकविताना विविध प्रयोग करण्यात रंगून जातो. शिकविता शिकविता शिकत जातो. त्यातून नवनवीन प्रकल्प हाती घेत असतो. डॉ. पाडेकर या अशाच शिक्षिका आहेत. प्रस्तुत नाट्यछटा लेखिकेने नाट्यछटा या साहित्य प्रकारावर शोधनिबंधही लिहिला आहे. तात्पर्य, डॉ. लताताई पाडेकर यांच्या या सर्वार्थाने अर्थसघन नाट्यछटा संग्रहाचे मनापासून स्वागत.
(ज्येष्ठ साहित्यिक व अध्यक्ष ,
१८वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, दिल्ली)











Be the first to review “Prakash Prenyasathi : Khajina Natyachatancha – प्रकाश पेरण्यासाठी : खजिना नाट्यछटांचा”
You must be logged in to post a review.