‘रानभूल’ ही एका हुकूमशाहीच्या अस्ताची उत्कंठावर्धक कथा आहे. संस्थानं विलीन झाली, तरी साठसत्तरच्या काळात स्वतःच्या जहागिर्या असलेले वतनदार, जमीनदार यांची सत्ता लहानलहान गावांमधून संपलेली नव्हती. अशाच एका जहागीरदार घराण्यातील संग्रामची पुण्यात वाढलेल्या, निसर्गाची ओढ असलेल्या मनस्वी दमयंतीला भूल पडते. त्याच्याशी लग्न करून ती त्याच्या गावी राहायला जाते.
तिथे गेल्यानंतर मात्र तिथल्या भव्य राजेशाही वातावरणाच्या आड लपलेल्या कहाण्यांनी ती चक्रावून जाते. मग त्या अन्यायाविरुद्ध दमयंती आवाज उठवते. तिथल्या स्त्रियांमध्ये आत्मविश्वास निर्माण करते.
घराचे कुटुंबप्रमुख व गावाचे सरपंच आबासाहेब यांच्या हाती एकवटलेल्या सत्तेविरुद्ध तिने उभारलेले बंड यशस्वी होते का?
नाट्यपूर्ण प्रसंगांच्या साखळीतून घडणार्या सत्तांतराची ही कथा.
रानभूल
-Binding: Paperback
-ISBN13: 9789386455932
-Language:Marathi
-Publication Year: 2018
-Author: Madhuri Talawalkar
-Product Code: VPG18240
₹200.00
Customer Reviews
There are no reviews yet.
Be the first to review “रानभूल”
You must be logged in to post a review.