सूफींची आदमगिरी-सूफी परंपरा व तत्त्वज्ञान

– Binding: Paperback
-ISBN13: 9789388424318
-Language: Marathi
-Publication Year: 2019
-Author: Dr. Alim Vakil
-Product Code: VPG19265

175.00

सूफींची आदमगिरी – सूफी परंपरा व तत्त्वज्ञान

  • माणसाला माणूस बनविण्याचे कार्य करणार्‍या सूफी संप्रदायाचा आढावा घेणारे पुस्तक.
  • समता, बंधुत्व, प्रेम, परस्पर विश्वास व गुरुंवरील श्रद्धा ही मूल्ये सूफी संप्रदायाने कशी जोपासली, हे सांगणारे पुस्तक.
  • सूफी संप्रदायाने दिलेला सहिष्णुता व शांतीचा संदेश याचे महत्त्व सांगणारे पुस्तक.
  • भारतीय समाजाला संजीवनी देणार्‍या सूफी तत्त्वांचा आढावा घेणारे पुस्तक.
डॉ. अलीम वकील यांनी 33 वर्षे राज्यशास्त्राचे अध्यापन केले. त्यांचे बारा ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. त्यांच्या ग्रंथांना महाराष्ट्र राज्य पातळीवरील सहा पुरस्कार मिळाले आहेत. ‘सूफी संप्रदायाचे अंतरंग’ या ग्रंथास रा. भि. जोशी, पद्मश्री विखे पाटील फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य तत्त्वज्ञान परिषदेचा गोएंका असे तीन पुरस्कार, तर मौलाना आज़ाद : धार्मिक आणि राजकीय विचार या ग्रंथास महाराष्ट्र साहित्य परिषदेचा शि. म. परांजपे आणि मराठवाडा साहित्य परिषदेचा म. भि. चिटणीस पुरस्कार आणि पुरोगामी लेखनासाठी सुगावा पुरस्कार मिळाले आहेत. ते 14व्या महाराष्ट्र राज्य राज्यशास्त्र - लोकप्रशासन परिषद, परभणीचे व 12व्या अखिल भारतीय मुस्लीम साहित्य परिषद, पुणेचे अध्यक्ष होते. ते महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमी, बालभारती, नागरिकशास्त्र संशोधन समिती, ‘इकॉनॉमिक स्टडीज’ (कोलकत्ता) या जर्नलच्या संपादक मंडळात सदस्य आहेत.

Customer Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “सूफींची आदमगिरी-सूफी परंपरा व तत्त्वज्ञान”