The diary of a young Girl [द डायरी ऑफ यंग गर्ल ]

209.00299.00

द डायरी ऑफ यंग गर्ल -‘माझ्यासारख्या एखादीच्या दृष्टीनं रोजनिशी लिहिणं हा खरोखरच एक अतिशय विलक्षण अनुभव आहे. मी याआधी काहीच लिहिलेलं नाही फक्त म्हणूनच नव्हे, तर पुढे मला किंवा इतर कोणालाही तेरा वर्षांच्या शाळकरी मुलीच्या स्वप्नाळू चिंतनात स्वारस्य वाटणार नाही, म्हणून मला तसं वाटतं.’

अॅन फ्रँक, शनिवार, २० जून १९४२

‘द डायरी ऑफ अ यंग गर्ल’ हा एका लहान मुलींच्या दृष्टिकोनातून दुसऱ्या महायुद्धावर टाकण्यात आलेला अपूर्व, हेलावून टाकणारा दृष्टिक्षेप आहे. अॅननं ज्या वेळी हे शब्द लिहिले होते, त्या वेळी अर्थातच आपण स्वप्नाळूपणे केलेलं हे चिंतन नाझींनी ज्यूंच्या केलेल्या सामुदायिक कत्तलींच्या दरम्यानच्या आयुष्याविषयीची माहिती देणारं प्राथमिक संसाधन ठरेल, हे तिला माहीत नव्हतं.

अन ही असामान्य, हुशार, विचारी कथाकार आहे आणि तिची रोजनिशी ही मनोरंजक आणि त्याबरोबरच ऐतिहासिक दस्तऐवज म्हणूनही लक्षणीय आहे. या रोजनिशीतील घटना दहशतीची फक्त ओझरती झलक दाखवत असल्या, तरी त्यांच्यातून युद्धाच्या काळातील मानवी स्वभावाचं, नातेसंबंधांचं आणि आशेचं ठसठशीत चित्रण समोर येतं.

‘या पुस्तकात अनेक महत्त्वाचे संदेश आहेत, पण सर्व लोकांना स्वातंत्र्यात मुक्तपणे जगण्याचा हक्क आहे, हा त्यातला सगळ्यांत महत्त्वाचा संदेश आहे. फक्त काही लोक वेगळ्या धर्माचे किंवा वंशाचे आहेत म्हणून त्यांना वेगळी वागणूक देता कामा नये, असं अॅनची ही कथा दाखवून देते:

– द गार्डियन –

‘दुसऱ्या महायुद्धाविषयी कोणीही कुठेही सांगत असलेल्या कथांपैकी सर्वांत जास्त हेलावून टाकणाऱ्या कथांमध्ये या रोजनिशीचा समावेश होतो:

Customer Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “The diary of a young Girl [द डायरी ऑफ यंग गर्ल ]”