राजा दशरथाच्या शांता या कन्येने असीम त्याग केला नसता, तर त्याला त्याचे हवेहवेसे वाटणारे पुत्र प्राप्त झाले असते का?
कोण होती मंथरा ? राणीची धूर्त आणि दुष्ट दासी, की राजप्रासादातल्या षड्यंत्रापासून आपल्या पाल्याचं रक्षण करण्याचा प्रयत्न करणारी प्रेमळ माता? मीनाक्षीच्या सुंदर डोळ्यांचं रूपांतरण कुरूपता आणि अनैतिक लालसेत कसं झालं? एका सदाचारी राजकुमाराभोवती फिरणाऱ्या महाकाव्यात स्त्रियांची भूमिका कोणती?
आनंद नीलकंठन हे अत्यंत लोकप्रिय लेखक आहेत. या पुस्तकात त्यांनी वाल्मिकींच्या कालातीत महाकाव्याचे अनेक पदर उलगडत महत्त्वाकांक्षा, प्रेम, समर्पण आणि धैर्य यांच्या कथा समोर आणल्या आहेत. रामायणातल्या स्त्रियांकडे नव्याने पाहण्याची दृष्टी ते त्यांच्या वाचकांना देऊ पाहतात. प्रेयसी, बहीण, पत्नी, माता अशा विविध रूपांत वावरणाऱ्या वाल्मिकींच्या रामायणातल्या या स्त्रिया गुंतागुंतीच्या ह्या महाकाव्याला एकत्र गुंफतात.
Be the first to review “Valmiki Ramayanatil paach Striya – वाल्मिकी रामायणातील पाच स्त्रिया”
You must be logged in to post a review.