होय, मी स्त्री आहे!
आपली ओळख आणि नवीन मापदंड निर्माण करत असतानाचा, एका तृतीयपंथी व्यक्तीचा असामान्य आणि धाडसी प्रवास या पुस्तकात चित्रित झाला आहे.
लहानपणापासूनच जाणवत गेलेले शारीरिक वेगळेपण, इथपासून ते एका महाविद्यालयाचे प्राचार्यपद संपादन करणे इथपर्यंतचा मानोबि बंदोपाध्याय यांचा जीवनप्रवास अतिशय मोकळेपणाने समोर येत जातो. अनेक अडथळ्यांना तोंड देत असतानासुद्धा शिक्षणाची कास मात्र त्यांनी कधीच सोडली नाही. आणि त्या जोरावरच प्राचार्यपद मिळवून स्वत:ची वेगळी ओळख त्यांनी निर्माण केली. हे सगळे होत असताना एका पुरुषाच्या स्त्रीमधल्या रूपांतराचीही सुन्न करणारी कहाणी आपल्यासमोर उलगडत जाते.
निखळ प्रामाणिकतेने आणि सखोल संवेदनशीलतेने त्यांनी ही कहाणी शब्दबद्ध केलेली आहे. मानोबि यांनी स्वत:ची ओळख निर्माण करण्यासोबतच संपूर्ण समाजाला जी प्रेरणा दिली, त्याचे चित्रण ही कादंबरी करते
Be the first to review “होय मी स्त्री आहे!”
You must be logged in to post a review.