हिंदू धर्माची पुनराभिव्यक्ती
‘हिंदू धर्माची पुनराभिव्यक्ती’ हे बौद्धिक विरोध करणारे पुस्तक आहे. सध्या विद्यापिठीय विद्वानांच्या वर्तुळात, प्रसारमाध्यमे आणि सामान्य मनात पसरलेल्या हिंदूभयगंडवादावर चतुर आणि प्रभावशालीपणे टीका करून वम्सी जुलुरी यांनी आपल्याला हे दाखवून दिले की, हिंदूभयगंडवादी दृष्टिकोन जी गोष्ट नाकारत आहे, ते ना केवळ सत्य आणि हिंदू विचाराचे मर्म आहे, तर ते ह्या सृष्टीचे पावित्र्य आणि पूर्णता आहे.
सृष्टी, इतिहास आणि इतिहासपूर्व काळ याविषयीच्या प्रसारमाध्यमांमधील धारणा, तसेच आर्य आक्रमण आणि बलीप्रथा याविषयीची हिंदूभयगंडवादी मिथके यांना बेधडक आव्हान देत ‘हिंदू धर्माची पुनराभिव्यक्ती’ने हिंदूभयगंडवाद आणि त्याच्या अहंकाराला हिंसक आणि आत्मघातकी संस्कृतीशी संबंधित असल्याचे दाखवून दिले आहे. ह्याचा विरोध केवळ नवीन हिंदू संवेदनशीलताच करू शकते. हे वर्तमानाकडे अशा दृष्टिकोनातून पाहण्याचे आव्हान आहे, जे आपला देश आणि काळ यांना पुन्हा एकदा सनातन धर्माच्या आदर्शांपर्यंत घेऊन जाईल.
Be the first to review “हिंदू धर्माची पुनराभिव्यक्ती”
You must be logged in to post a review.