महाराष्ट्राची दुर्गपंढरी – नाशिक जिल्ह्यातील किल्ले
महाराष्ट्राचा इतिहास व भूगोल गड-किल्ल्यांनी व्यापला आहे. सह्याद्रीच्या डोंगररांगांतील किल्ले जसे ऐतिहासिक पराक्रमांची साक्ष देतात, तसेच ते तरुणांना ट्रेकिंगसाठी आकर्षित करतात. या पुस्तकात नाशिक जिल्ह्यातील ६० किल्ल्यांची सफर घडवली आहे. यातील प्रत्येक किल्ला वैशिष्ट्यपूर्ण आहे. उदा. महाराष्ट्रातील सर्वोच्च किल्ला साल्हे र, औरंगजेबाला सलग साडेपाच वर्षे टक्कर देणारा रामसेज, शिवछत्रपतींचे १५ दिवस वास्तव्य अनुभवलेला पट्टा ऊर्फ विश्रामगड. तसेच प्रत्येक किल्ला दुर्गप्रेमींची वेगवेगळ्या प्रकारे परीक्षा घेणारा आहे. सर्वसाधारणपणे नाशिक जिल्ह्यातील किल्ल्यांची १२ डोंगररांगांमध्ये विभागणी होते.या पुस्तकात किल्ल्यांची मांडणी रांगनिहाय व तालुकानिहाय केली आहे, त्यामुळे या पुस्तकाच्या मदतीने किल्ल्यांची भ्रमंती सोपी होते व त्यांच्याशी निगडित इतिहासाचाही आनंद प्रत्येकाला घेता येतो.
Be the first to review “महाराष्ट्राची दुर्गपंढरी – नाशिक जिल्ह्यातील किल्ले”
You must be logged in to post a review.