सोनार ज्ञाती समाजातील कुटुंबीयांचे संत श्री नरहरी सोनार हे आराध्य दैवत आहे. प्रस्तुत पुस्तकात लेखक श्री. ग. शां. पंडित यांनी संत नरहरी महाराजांच्या जीवनचरित्रावर, त्यांच्या वाङ्गयावर नवा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच आज समाजाच्या वेगवेगळ्या पोटशाखांमध्ये विखुरलेल्या सोनार समाजाला एकाच छताखाली आणण्यासाठी संत नरहरी महाराजांच्या जीवनातील कटिसूत्र प्रसंगातून समाजाला एकतेचा संदेश देण्याचा अत्यंत स्तुत्य प्रयत्न केला आहे. त्यासाठी लेखकाने आधीच्या काही पुस्तकांचा, त्या लेखकांच्या मतांचा यथायोग्य परामर्श घेतला आहे. संत नरहरी महाराजांच्या जीवनाविषयी काही नवीन संदर्भ जोडल्यामुळे बरीच नवी माहिती प्रथमच वाचकांसमोर येत आहे, ही अत्यंत समाधानाची व स्वागतार्ह बाब आहे. त्यांच्या चरित्रविषयक बाबींविषयी आपल्या मनात संभ्रम राहू नये आणि त्यांच्या चरित्राविषयी नव्याने प्रकाशात आलेली माहिती सामान्यजनांना समजावी, यासाठीच या छोटेखानी चरित्र पुस्तकाची निर्मिती लेखकाने केली आहे. याशिवाय माहितीपूर्ण अशा आणखी काही परिशिष्टांमुळे प्रस्तुत पुस्तकाला संदर्भमूल्य प्राप्त झाले आहे. श्री. पंडित यांच्या लेखनात संशोधन पुढे नेण्यासाठी आवश्यक असणारी तटस्थता आहे. त्यामुळे त्यांचा हा उपक्रम निश्चितच स्तुत्य आणि कौतुकास्पद आहे. संदीप भानुदास तापकीर (इतिहास अभ्यासक व लेखक)
Sant Narhari Sonar : Charitra Ani Wangmaya -॥ संत नरहरी सोनार ॥ चरित्र आणि वाङ्गय
- ASIN : B0FHH5FN1Z
- Publisher : Vishwakarma Publications; First Edition (13 July 2025)
- Language : Marathi
- Perfect Paperback : 84 pages
- Reading age : 10 years and up
- Item Weight : 125 g
- Dimensions : 14 x 1 x 21 cm
- Country of Origin : India
- Packer : Vishwakarma Publications
- Generic Name : Books
save
₹5.00₹120.00₹125.00
Customer Reviews
There are no reviews yet.
Be the first to review “Sant Narhari Sonar : Charitra Ani Wangmaya -॥ संत नरहरी सोनार ॥ चरित्र आणि वाङ्गय”
You must be logged in to post a review.