प्रसारण इतिहासात भारतीय आकाशवाणीचे कार्य मौलिक आहे. श्रोत्यांचा प्रेमादर मिळालेल्या या संस्थेला या वर्षी (२०२६) शंभरावे वर्ष लागत आहे. शतकभराच्या वाटचालीत संस्थात्मक विस्तार, आशय निर्मिती, प्रस्तुती, खाजगीकरण या सर्व बाबतींत काय आणि कसे घडत गेले, याचा रोचक, माहितीपूर्ण आणि सचित्र मागोवा या पुस्तकात घेण्यात आला आहे. अनेक कलावंत, लेखक, संशोधक, अभिनेते यांचे नाते सांगणारे विश्लेषण आपल्याला या पुस्तकात वाचायला मिळेल.
२) भारतभरातील अनेक आकाशवाणी कार्यक्रमांचे ठळक उपक्रम, आठवणी आणि घटना सांगणारा आशय.
३) इलेक्ट्रॉनिक माध्यम स्पर्धेत टिकून राहण्यामागील सामर्थ्य स्थळांचे अचूक विश्लेषण.
४) भारतीय संस्कृती टिकवण्याचा संस्कार करणाऱ्या ज्ञानयज्ञाचा मागोवा घेणारा महत्त्वाचा दस्तऐवज.











Be the first to review “Aakashwaniche He..-आकाशवाणीचं हे….शतकपूर्तीच्या वळणवाटा”
You must be logged in to post a review.