अभेद्य ते भेदताना : आंतरधर्मीय विवाहित जोडप्यांचे अनुभव
धर्म आणि जातीच्या भिंती आज एकविसाव्या शतकातही अभेद्य आहेत. जेथे आपला समाज अजूनही आंतरजातीय विवाह मान्य करत नाही, तेथे आंतरधर्मीय विवाहाची कल्पनाही सहन होत नाही. धर्माधर्मांमध्ये व जातीजातींमध्ये द्वेष व तिरस्कार विकोपाला जात आहे. विशेषतः हिंदू व मुस्लीम या समाजांमध्ये परस्परांबद्दल प्रचंड संशय आहे. या समाजांतील परस्पर विवाहांबाबत ‘लव्ह जिहाद’ व ‘घरवापसी’ या शब्दांनी वातावरण कलुषित केले आहे. या पार्श्वभूमीवर, आपल्या प्रेमाच्या व भारतीय संविधानाच्या साक्षीने आंतरधर्मीय विवाह केलेल्या जोडप्यांचे अनुभव या पुस्तकात मांडले आहेत. आत्यंतिक त्रास, कुटुंब व समाजाच्या प्रखर विरोधाचा सामना करत आपले प्रेम, विवेक व सारासार बुद्धी जागी ठेवून ही अभेद्य भिंत भेदण्याची धडाडी या जोडप्यांनी दाखवली आहे. आपल्या पुढच्या पिढीत सर्वधर्मसमभावाची – धर्मनिरपेक्षतेची रुजवण करत ते भविष्यकाळ बदलण्याची धडपड करत आहेत. त्यांचे प्रेरक अनुभव या पुस्तकात आहेत.
Be the first to review “अभेद्य ते भेदताना – आंतरधर्मीय विवाहित जोडप्यांचे अनुभव”
You must be logged in to post a review.