महाराष्ट्रातला अहमदनगर जिल्हा म्हणजे असंख्य ऐतिहासिक घटना-घडामोडींचा साक्षीदार होय. सातवाहन राजवटीपासून ते ब्रिटिश राजवटीपर्यंत सगळ्या कालखंडांत अहमदनगरचा इतिहास आणि भूगोल सातत्याने बदलत गेला. याच स्थित्यंतरांचे केंद्रबिंदू असलेल्या, अहमदनगर जिल्ह्यातील एकूण १७ किल्ल्यांची परिपूर्ण माहिती हे पुस्तक देते. केवळ माहितीवजा इतक्या मर्यादित स्वरूपात न राहता, प्रत्येक किल्ल्याचे वैशिष्ट्य, त्यासंबंधी निगडित इतिहासाचे संदर्भ या अनुषंगाने पुस्तक वाचकांशी जणू संवाद साधते. अहमदनगर जिल्ह्यातील ५ अप्रतिम भुईकोटांसह रांगडे म्हणावेत अशा १२ गिरिदुर्गांचाही समावेश यामध्ये आहे. परिणामी, गडकिल्ले बघू इच्छिणार्यांना सर्वांगीणदृष्ट्या उत्तम वाटाड्या ठरेल, असे हे पुस्तक आहे.
निजामशाहीच्या गतवैभवाची स्फूर्तिस्थाने : अहमदनगरचे गडकोट
-Binding: Paperback
-Language: Marathi
-ISBN:9789390896862
-Publication Year: 2021
-Author: Sandeep Tapkir
-Product Code:VPG19255
₹195.00
Customer Reviews
There are no reviews yet.
Be the first to review “निजामशाहीच्या गतवैभवाची स्फूर्तिस्थाने : अहमदनगरचे गडकोट”
You must be logged in to post a review.