आनंदाची दैनंदिनी
आजचा दिवस पूर्णपणे जगुन घ्या, उद्याच्या दिवसावर काही ठेवू नका,’ असे हॉरेस नावाच्या एका कवीने म्हटले आहे. म्हणजेचं वर्तमानात जगा, भूतकाळाच्या आठवणींवर जगू नका किंवा भविष्याचीही फार चिंता करू नका. डॉ. रेखा शेट्टी यांनी याच तत्त्वावर आधारलेली दैनंदिनी लिहिली आहे. डॉ. श्रुती पानसे यांनी अनुवाद केला आहे. वर्षातील ५२ आठवड्यांची त्यांनी विभागणी केली आहे. प्रत्येक आठवड्यात काय करायचे आणि ते का करायचे हे त्या विस्ताराने सांगतात. एखाद्या आठवड्यात त्या अनुकंपेने वागा असे सांगतात, तर एखाद्या आठवड्यात पारंपरिक चौकट मोडा असे त्या सांगतात. एखाद्या आठवड्यात आनंदी राहण्याचा राजमार्ग त्या सांगतात, तर एखाद्या आठवड्यात शेजारी प्रथम असे त्या म्हणतात.
Be the first to review “आनंदाची दैनंदिनी”
You must be logged in to post a review.