अपराजिता
आ. डॉ. नीलम गोऱ्हे ! गेली 35 वर्षे महाराष्ट्राच्याच नव्हे, तर भारतीय राजकीय-सामाजिक अवकाशात विजेच्या प्रखर तेजाने तळपणारं व्यक्तिमत्त्व.
आपल्या संपूर्ण कारकिर्दीत नीलमताईंनी राजकारण आणि समाजकारण यांची सुंदर सांगड घातली. शिवसेनेची वीस वर्षांची वाटचाल असो, की विधानपरिषदेवरील गेल्या 16 वर्षांची आमदारकी असो; प्रवक्तेपणाची जबाबदारी असो, की संयुक्त राष्ट्रसंघाच्या परिषदांतील प्रतिनिधित्व असो, नीलमताईंनी महिलांचे प्रश्न हाच आपल्या कामाचा केंद्रबिंदू मानला. अर्जुनाला दिसणार्या पक्ष्याच्या डोळ्याप्रमाणे नीलमताईंचा कामाचा फोकस नेहमीच स्त्रियांना सामाजिक न्याय, समता आणि त्यांचा राजकीय सहभाग यांवर राहिला. प्रबोधन, रचनात्मक कार्य आणि संघर्ष या त्रिसूत्रीवर त्यांच्या प्रचंड कामाचा डोलारा उभा राहिला. वैचारिक स्पष्टता, पक्की बैठक, प्रखर बुद्धिमत्ता, निर्भीडपणा, कामाचा झपाटा, संवेदनशीलता आणि कुठल्याही घटनेकडे पाहण्याचा लोकशाहीवादी, समतावादी, न्यायवादी दृष्टिकोन यांमुळे नीलमताईंची स्वतंत्र आणि खास अशी मुद्रा सामाजिक क्षेत्रावर उमटली आहे.
अर्थात, हा प्रवास वाटतो तितका सोपा नव्हता. या संपूर्ण प्रवासात त्यांचे आस्थेचे विषय, त्यावर त्यांनी केलेले मनःपूर्वक आणि अथक काम, त्यांच्या समोरच्या अडचणी, अडथळे, करावा लागलेला आतला-बाहेरचा संघर्ष आणि हाती आलेली मधुर कर्मफळं या सगळ्यांचा एक ओघवता पट म्हणजे हे पुस्तक आहे.
सामाजिक क्षेत्रात काम करू इच्छिणार्या प्रत्येक स्त्रीसाठी नीलमताईंचे काम हा एक वस्तुपाठ आणि अभ्यासकांसाठी एक महत्त्वाचा दस्तऐवज ठरावा.
Be the first to review “अपराजिता सामाजिक कर्तृत्वाची संघर्षयात्रा”
You must be logged in to post a review.