ध्यास सर्वोत्तमाचा : अमिताभ स्टईलने
तुम्ही परिपूर्णतेच्या शोधात आहात? अमिताभ बच्चन यांच्या आयुष्याकडे पाहिलेत, तर त्या दृष्टीने काय शिकायला मिळेल? सगळे… हो, सगळेच!
अमिताभ बच्चन हे केवळ एक बुद्धिमान नट किंवा ‘सहस्रकातील एकमेव सुपरस्टार’ नाहीत, ते स्वतःच एक ‘चालतीबोलती संस्था’ आहेत- केवळ अभिनय नव्हे, तर यशस्वी होण्यासाठी लागणार्या सर्व गोष्टी त्यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये आहेत. त्यांच्या गुणांची यादी केली तर आपल्याला परिपूर्णतेचा, सर्वोत्कृष्ट होण्याचा कानमंत्रच मिळेल. व्यावसायिकता, सदैव ध्येयप्राप्तीच्या दिशेने प्रयत्न व त्यासाठीची बांधिलकी आणि कधीही हार न मानण्याची वृत्ती- या आणि अशा अनेक गुणांची प्रेरणा आपल्याला त्यांच्याकडून घेता येईल.
आजवर त्यांना चार राष्ट्रीय पुरस्कार, पंधरा फिल्मफेअर पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहेच; पण आत्तापर्यंत 41 वेळा विविध पुरस्कारांसाठी त्यांना नामांकन मिळाले आहे. त्यांच्यातील परिपूर्णता दाखवायला इतकेच प्रमाण पुरेसे आहे. आजवर त्यांच्या आयुष्यातील बर्या-वाईट प्रसंगांचा सामना त्यांनी कसा केला? सर्वांत चांगला क्षण कोणता? सर्वांत अवघड क्षण कोणता? सर्वांत वाईट, भीतिदायक प्रसंग कोणता?
बेभरवशी चित्रपट कारकीर्द आणि व्यवसायातील अपयश यांतून फिनिक्स पक्ष्याप्रमाणे त्यांनी अशी झेप घेतली की पुन्हा मागे वळून पाहिलेच नाही. या सगळ्या प्रसंगांवर मात करायची असेल, तर त्याला अथक परिश्रम, ध्येयप्रेरित जीवनक्रम, चिवट इच्छाशक्ती, संयम, संकटांना पुरून उरण्याची जिद्द या सगळ्या गुणांची आवश्यकता असते.
शिक्षणतज्ज्ञ व गुरू वीरेंदर कपूर यांनी या पुस्तकामध्ये अमिताभ बच्चन यांच्या प्रत्येक गुणधर्माचा, स्वभाववृत्तीचा ऊहापोह केला आहे. अमिताभ बच्चन हे अत्यंत प्रेरक व्यक्तिमत्त्व आहेत. हे पुस्तक ‘बिग बी’ यांच्या यशाचे केवळ गुपित मांडत नाही, तर सर्वोत्तम, सर्वोच्च स्थानी पोहोचण्यासाठी काय करावे लागते, त्याचेदेखील विश्लेषण करते.
Be the first to review “ध्यास सर्वोत्तमाचा अमिताभ स्टाईलने”
You must be logged in to post a review.